Ad will apear here
Next
‘मी विठ्ठलाचा व वारकऱ्यांचा सेवक’
रेठरे बुद्रुक (सातारा) :  ‘विठ्ठल रुक्मिणी समितीच्या अध्यक्षपदाचा बहुमान हा केवळ माझा बहुमान नसून सातारा, सांगली जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाचा बहुमान आहे. वारकऱ्यांच्या योगदानामुळे व पुण्याईमुळे मला ही संधी मिळाली आहे. येत्या काळात मी विठ्ठलाचा व वारकऱ्यांचा सेवक म्हणून कार्यरत राहीन,’ अशी भावना डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केली.

विठ्ठल रुक्मिणी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड झाल्याबद्दल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना व कराड तालुका साखर कामगार संघ यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. 

डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘माझ्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी ही विठ्ठलाची इच्छा असल्याने देवस्थानच्या अध्यक्षपदी मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे येत्या काळात वारकरी व देवस्थानच्या अडीअडचणी व अधिकाधिक सेवा पुरवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. पंढरपूर देवस्थानचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने माझी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी पंढरपूर देवस्थानचे चार विकास आराखडे तयार करण्यात आले होते. परंतु ते पूर्ण झालेले नाहीत. म्हणून एका महिन्यात श्वेतपत्रिका काढून नवीन विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. लवकरच या संदर्भात बैठक घेऊन चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्त चंद्रकांत दळवी यांना या देवस्थानचा विकास गतिमान करण्यासाठी स्वतंत्र व सक्षम मुख्याधिकारी देण्याची सूचना केली असून, प्रांतधिकारी संजय तेली यांची नियुक्ती केली आहे. तसेच भाविकांसह वारकऱ्यांना देवाचे दर्शन सुलभरीत्या होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला मिळालेल्या काळात मी गतिमान प्रशासन व पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहीन. यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZQMBE
Similar Posts
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन शिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात २०१७-१८ गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी
वारकरी हा केंद्रबिंदू मानून कार्य करणार : डॉ. अतुल भोसले कराड (सातारा) : ‘माझ्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी ही परमेश्वराचीच इच्छा असल्याने, मला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात वारकरी हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि वारकऱ्यांना अधिकाधिक सेवासुविधा पुरविण्यासाठी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड कराड (सातारा) : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आणि कराड येथील कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले   यांची निवड झाली आहे. राज्य सरकारने ही निवड जाहीर केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल कराड, मलकापूर भागातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला
कृष्णा कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण रेठरे बुद्रुक (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कराडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला कराड तालुका कृषी अधिकारी दत्तत्रय खरात, वाळवा तालुका उपविभागीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language